?️ सर्वोच्च सन्मान.. निवडणुकीपूर्वी शेतकरी, जाटांसह दक्षिणेला सन्मान.. चौधरी चरणसिंग, स्वामिनाथन, नरसिंह राव यांना भारतरत्न, प्रथमच १८ दिवसांत ५ मान्यवरांना सन्मान…
?️ सरकारकडून दगाफटका होऊ नये म्हणून आजपासून उपोषण.. आंतरवाली सराटीत पाणीही घेणार नाही.. मनोज जरांगेंचा इशारा
?️ ज्या बॉडीगार्डच्या पिस्तुलामधून घोसाळकरांवर मॉरिसने गोळ्या झाडल्या, त्याच्यासह ३ अटकेत.. शिवसैनिकांच्या गर्दीत अभिषेकवर अंत्यसंस्कार, आरोपी मॉरिसचेही केले दफन…
?️ आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना जूनपासून मोफत उच्च शिक्षण.. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची जळगावमध्ये माहिती…
?️ नियमात दिरंगाई; ४ वर्षांपासून सीएए, अनेक विधेयके १५ वर्षांपासून रखडली.. संसदेत विद्येयक पारित, मात्र नियम निश्चित करण्यास मुदतवाढ मागताहेत मंत्रालये…
?️ सर्व जिल्ह्यांचा वातावरणीय बदल कृती आराखडा.. प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवर कक्ष…
?️ नसबंदी नको, शिकारीची परवानगी द्या.. डॉ. माधव गाडगीळ यांचे मत; वन्यप्राण्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाय…
?️ पुण्याच्या लौकिकाला साजेशा सुविधा द्या.. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या पाहणीनंतर अजित पवारांच्या सूचना…
?️ कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज महिनाअखेरीस संपणार.. मार्चपासून अहवाल तयार करण्याचे काम…
?️ ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी.. मॉरिसला शिंदेंचे निमंत्रण : राऊत.. हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद : उदय सामंत…
?️ अभिषेक यांचा ऑटोचालकांसोबतचा वाद मॉरिसने लाइव्ह केल्याने ठिणगी.. ९ कोटींच्या कर्जात बुडालेल्या मॉरिसने पत्नी सोडून गेल्यावर आखला कट…
?️ पुण्यात वागळे, ॲड. सरोदेंच्या वाहनावर तीन ठिकाणी हल्ला.. अडवाणीविरोधी वक्तव्य भोवले.. भाजप आघाडीचे कार्यकर्ते भिडले…
?️ मंगळवेढा येथे ढाब्यासमोरील वाहने काढण्यास सांगितल्याने पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण.. मारहाण करणाऱ्या ढाबाचालकासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल, चौकशी सरू…
?️ देवभूमीत षड्यंत्र.. हल्द्वानीमध्ये दंगल : दगड-पेट्रोल- बॉम्बचा मारा; सहा लोकांचा मृत्यू.. ३०० पेक्षा अधिक पोलिस जखमी…
?️ केरळ.. धावतानाच चार्ज होईल ईव्ही.. ड्राइव्ह चार्ज मार्ग असलेले पहिले राज्य; पुढील वर्षापासून मिळेल सुविधा…
?️ रणजी ट्रॉफी.. शुक्रवारी २५ अर्धशतके, ११ शतके.. पृथ्वीने उपाहारापूर्वी शतक झळकावले, रणजीचे १८ सामने सुरू.. मुंबई संघाने छत्तीसगड संघाविरुद्ध पहिल्या दिवशी केल्या ४ बाद ३१० धावा…
?️ पॉकेट-रॉकेटची निवृत्ती.. १०० मीटरची ५ वेळची जगज्जेती जमैकन ‘स्प्रिंट क्वीन’ फ्रेझर प्राइस पॅरिस ऑलिम्पिकनंतर ट्रॅकला करणार ‘बाय-बाय’. शैली ॲन फ्रेझर प्राइस २०१७ मध्ये आई झाली, त्यानंतर तिने जागतिक स्पर्धेत तीन सुवर्ण जिंकले…
?️ इम्रान यांचा झंझावात पाहून लष्कर मुख्यालयात पोहोचले निवडणूक आयुक्त, साहबाज.. लष्कराने लाख प्रयत्न करूनही इम्रान यांचे समर्थक अपक्ष उमेदवार आघाडीवर…
कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात.देव फक्त हतावर रेषा देतो, त्यात रंग आपल्याला भरावे लागतात..!
☘️”श्री स्वामी समर्थ”..!☘️
संपर्क,लहु चव्हाण,पाचगणी
तालुका : महाबळेश्वर
? मोबा.९९२३३९६३१० /८३२९३६७१०८