?दि. ११/२/२०२४?
?️ सुधारणा, सुशासन, परिवर्तन.. पंतप्रधानांच्या भाषणात गेल्या पाच वर्षांतील निर्णयांचा आढावा…
?️ निवडणुकीपूर्वी सीएए लागू होईल गृहमंत्री.. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर मोठे पाऊल…
?️ मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे आंतरवालीत तिसरे उपोषण सुरू.. आताचे आंदोलन या सरकारला झेपणार नाही : इशारा…
?️ द्वेषाचे राजकारण.. उद्धव-देवेंद्रांचा फेब्रुवारीतच शिमगा.. कायदा-सुव्यवस्थेवरून अशोभनीय भाषेत टीका…
?️ संभाजीनगर, परभणीत भाकरी फिरवण्यास उद्धवसेनेचा नकार.. मराठवाड्यात मविआचे जागावाटप.. हिंगोली-जालन्यावर खल…
?️ लोकसभा आचारसंहिता पाच मार्चपूर्वी.. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मालेगावमध्ये सूतोवाच…
?️ हायकोर्ट स्वीय सहाय्यक पदाचा पेपर सोशल मीडियावर फुटला.. संभाजीनगरातील प्रकार, ॲडमिनविरुद्ध गुन्हा…
?️ वंदे भारत… दिल्ली ते श्रीनगर या महिन्यात १२ तासांत; सध्या १८ तास लागतात, २०२६ मध्ये सीमेपर्यंत रेल्वे.. दारामुल्ला ते उरी-कुपवाडापर्यंत ट्रैक, ड्रोन सर्व्हेही; काम एप्रिलपासून…
?️ ९.६७ लाख शेतकऱ्यांना भरपाई; ७०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर.. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम…
?️ मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.. परभणी जिल्ह्यातील आतापर्यंतची ११ वी आत्महत्या…
?️ आता विजेऐवजी हायड्रोजनवर ट्रेन चालवणार रेल्वे मंत्रालय, चेन्नईच्या आयसीएफमध्ये होणार उत्पादन.. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत घोषणा…
?️ ८ वर्षांत रूफटॉप सोलारचे ग्राहक ११३ पट, विद्युत क्षमता ९२ पटींनी वाढली.. २०१६-१७ मध्ये २० मेगावट निर्मिती, जानेवारी २०२४ मध्ये बीज उत्पादन १.८८३ मेगावॅटवर…
?️ बॉलीवूडच्या तुलनेत या वर्षी टॉलीवूडची कमाई अधिक.. तेलगू चित्रपटांनी आतापर्यंत कमावले ३८५ कोटी रुपये, हिंदी चित्रपटांची कमाई २७५ कोटी…
?️ पाचगणीचे पॅराग्लायडिंग अचानक उतरले सांगोल्यात.. फ्रान्सच्या पर्यटकाला ग्रामस्थांनी सोडले महाबळेश्वरला…
?️ निर्यातबंदीमुळे विदेशात कांद्याचे दर प्रतिक्विंटल १ हजार रुपयांवरून १० हजारांवर, म्हणून डाळिंब, टोमॅटोच्या खोक्यांतून ३ देशांत तस्करी.. दुबई, श्रीलंका,बांगलादेशात चोरटी वाहतूक; महिनाभरात तस्करांची ५० कोटींची कमाई…
?️ राज्यात सायबर गुन्ह्यांत ५ वर्षांत १३०० कोटी लंपास.. अपुरी यंत्रणा असल्याने निपटारा नाही : शिंत्रे…
?️ १९ वर्षांखालील विश्वचषक.. पूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी युवा संघ सज्ज.. आज भारत-ऑस्ट्रेलिया फायनल; सध्या स्पर्धेत दोन्ही संघ अपराजित…
?️ लष्कराने डोळे वटारले; पाकमध्ये शरीफ-झरदारी आघाडी सरकार.. बिलावल यांचा दावा.. आघाडी सरकार स्थापणार नाही…
निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे. कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते. रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो. आणि दुःख पचले नाही तर नैराश्य वाढत जातं..!
☘️“श्री स्वामी समर्थ”..!☘️
संपर्क,लहु चव्हाण,पाचगणी
तालुका : महाबळेश्वर
? मोबा.९९२३३९६३१० /८३२९३६७१०८
