पाचगणी,दि.१० : श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ अन्नछत्रमंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी परिक्रमाचे बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी पाचगणी शहरात आगमन होत आहे. यापादुका पालखी सोहळ्यास भावीक भक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान पालखी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील २२ वर्षापासून या परिक्रमा सोहळ्याचे आयोजन केले असून पादुकांचे आगमण स. १०.०० वा. पाचगणी बसस्थानक परिसरात होणार आहे.पादुका पुजन झाल्यावर ढोल ताशांच्या गजरात शहरातून पालखी पादुका मिरवणूक काढण्यात आल्यावर
दु.१२.०० वा शांत कॉटेज येथे आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यापादुका पालखी सोहळ्यास भावीक भक्तांनीमोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान मेहुल पुरोहित, प्रमोद शिंदे, संदेश बुटाला, सुनील उंबरकर, हिमांशू पुरोहित आदी मंडळीनी केले आहे.