योगाने दिवसाची सुरुवात; वाई येथील चौगुले इंडस्ट्रीजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात…
वाई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वाई येथील एमआयडीसी रोडवरील चौगुले इंडस्ट्रीजच्या मारुती सुझुकी शोरूममध्ये योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शोरूममधील महिला व पुरुष अशा सुमारे १५ कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत योग दिन साजरा केला.
दैनंदिन कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी कर्मचाऱ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचा सराव केला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, तसेच कार्यक्षमताही वाढते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला.